टंकलेखन-लघुलेखन यश: 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ₹6500 प्रोत्साहनपर अनुदान!
संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, जी व्यक्तींना व्यावसायिक कौशल्ये शिकण्यास आणि रोजगार मिळवण्यास मदत करते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (मराठी/हिंदी/इंग्रजी ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना ₹ ६,५००/- प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे:
योजनेचे उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील (अमृतच्या लक्षित गटातील जाती) उमेदवारांना शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे आहे.
अमृतचा लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील अशा जाती, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत अशाच प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही. या गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी, युवक आणि युवती, जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते या योजनेसाठी पात्र असतील.
लाभार्थी पात्रता निकष:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
- अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
- लाभार्थ्याचे वय १६ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे.
- अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र आणि संबंधित संस्था चालकांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
- अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या (MSCE) शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वस्वाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक राहील.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी भरलेल्या फी / शुल्काची स्वस्वाक्षरीत (Self-attested) पावती आवश्यक आहे.
- उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील (बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड) आणि रद्द केलेल्या चेकची प्रत जोडावी.
लाभाचे स्वरूप:
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य प्रदान केले जाईल:
- संगणक टंकलेखन (GCC-TBC) उत्तीर्ण: जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) (कॉम्पुटर टायपिंग मराठी / हिंदी, इंग्रजी ३०, ४०, ५० व ६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रु. ६,५००/- (अक्षरी रुपये सहा हजार पाचशे फक्त) प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल.
- ऑनलाईन लघुलेखन उत्तीर्ण: जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑनलाईन लघुलेखन परीक्षा (मराठी / हिंदी ६०, ८०, १०० व १२० शब्द प्रति मिनिट तसेच, इंग्रजी लघुलेखन ६०, ८०, १००, १२०, १३०, १४०, १५० व १६० शब्द प्रति मिनिट) उत्तीर्ण होतील, त्यांना एकरकमी रु. ५,३००/- (अक्षरी रुपये पाच हजार तीनशे फक्त) प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मिळेल.
- प्रोत्साहनपर अर्थसहाय्याची रक्कम अमृत संस्थेमार्फत थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.
- याव्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञेय राहणार नाही.
अर्ज करा:
जर तुम्ही अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करत असाल आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची संगणक टंकलेखन किंवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असाल, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्वरित www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा.
Please Like, Comment & Share