मंडळाच्या आदेशानुसार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे कामगार आपल्या सोयीच्या ठिकाणाहून अर्ज भरू शकतील.
ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया:
- बांधकाम कामगारांनी आपले नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावेत.
- अर्ज भरल्यानंतर, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आपल्या सोयीची तारीख निवडावी.
- ६ फेब्रुवारी २०२५ पासून तारीख निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे.
- ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील.
लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत:
- ज्या कामगारांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतली आहे, त्यांची ती तारीख रद्द करण्यात आली आहे.
- असे कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात.
- रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी "Change Claim Appointment Date" ह्या बटनावर क्लिक करावे.
- सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल.
- नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाइलवर एक OTP येईल.
- OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे, त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे.
- त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता.
- अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता.
अधिक माहितीसाठी:
प्र ज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर
मो.9689644390
विशेष बाब बांधकाम कामगारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यामुळे, आता त्यांना नोंदणी, नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुका सुविधा केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचेल.
Please Like, Comment & Share