RTE 25% Admission 2025, पालकांसाठी महत्वाची सूचना

Admin
0


RTE Online Admission 2025-26 आरटीई अंतर्गत २५% प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत फक्त काही दिवस शिल्लक आहे. २७ जानेवारी २०२५ ही अंतिम तारीख आहे. आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आजच अर्ज करा.


काय आहे आरटीई?

आरटीई म्हणजे Right to Education (शिक्षणाचा अधिकार). या कायद्यानुसार प्रत्येक बालकाला निःशुल्क आणि अनिवार्य शिक्षण घेण्याचा हक्क आहे. या अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५% जागांची राखीव जागा असते जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी असते.


पालकांसाठी महत्वाची सूचना (आरटीई प्रवेश 2025-2026)

आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025-2026 साठी अर्ज भरताना खालील गोष्टींची काळजी घ्या:

  • अर्ज भरताना काळजीपूर्वक: अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावा.
  • जन्म तारीख: आपल्या बालकाचा जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. ही माहिती एकदा भरल्यानंतर बदलता येणार नाही.
  • शाळा निवड: १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.
  • आवश्यक कागदपत्रे: अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र तयार ठेवावीत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो.
  • एकच अर्ज: एका बालकासाठी एकच अर्ज भरावा. डुप्लिकेट अर्ज भरल्यास दोन्ही अर्ज रद्द होतील.
  • अर्ज क्रमांक जपून ठेवा: अर्ज भरून झाल्यावर अर्ज क्रमांक आणि मोबाइल नंबर जपून ठेवा.
  • सत्य माहिती: अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास प्रवेश रद्द होईल.
  • पासवर्ड विसरलात तर: पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा.
  • अंतिम तारीख: अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27/01/2025 आहे.
  • दिव्यांग बालके: दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.
  • निवासी पुरावा: सन 2025-2026 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक मान्य नाही. बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.
  • लोकॅशन: अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google map वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.
  • जन्मतारखेबाबत समस्या: दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास [email protected] OR [email protected] वर इमेल पाठवावा.

आवश्यक कागदपत्रे येथे क्लिक करा

अर्ज भरण्यासाठी संपर्क 

प्रज्वल डिजिटल सर्व्हिसेस नेताजी नगर लातूर 

मो.9689644390

Online New Registration 

अधिकृत वेबसाईट 

अधिकृत मूळ जाहिरात


आपल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरटीईचा लाभ घ्या!


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!