आजपर्यंत सर्वात लोकप्रिय योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील विशेषतः महिलांसाठी अतिशय उपयुक्त योजना ठरत आहे यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यास चालना मिळाली आहे. महिलांचे कौटुंबिक महत्त्व व समाजातील अस्तित्व व त्यांना येणाऱ्या कौटुंबिक अडीअडचणीसाठी ही योजना लाभदायक ठरणार आहे. या योजनेतून दरमहा महिलांना पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे महिलांचा विकास होण्यास मदत होईल.
योजनेत नोव्हेंबर 2024 मध्ये दोन मोठे बदल
ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज केला आहे किंवा योजनेचे पैसे प्राप्त झालेले आहेत. कोणत्या बँक खाते मध्ये त्यांचे पैसे ट्रान्सफर झाले आहेत किंवा ही एकूण किती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे याविषयी माहिती अर्ज केलेल्या लॉगिन डॅशबोर्ड मध्ये दिसणार आहे. तसेच रक्कम न मिळण्याचे कारण त्रुटी स्पष्ट होणार आहे.
महिलांना लाभ मिळण्यासंबंधी
संजय गांधी निराधार योजना यापूर्वी कोणत्या शासकीय योजनेचा अर्जदार लाभ घेत असल्यास त्यांना आता लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला यापूर्वीच संजय गांधी निराधार किंवा इतर योजनेचा लाभ घेत आहे त्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार नाही.
योजनेत अर्ज अपात्र होण्याचे कारण
1. ज्या महिला यापूर्वी शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत
2. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे
3. अन्य शासकीय योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिला
ज्या महिलांना यापूर्वी सदरील योजनेचा लाभ मिळाला आहे व त्या महिला यापूर्वी शासकीय अनुदानाचा लाभ घेत आहेत यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर प्रक्रियेतून त्यांना अपात्र करण्यात येईल असा पर्याय No/Yes डॅशबोर्ड मध्ये उपलब्ध झालेला आहे.
No नो याचा अर्थ तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही सदरील योजनेत पात्र झाला आहात असेच सिद्ध होते.
Yes एस म्हणजे तुम्हाला सदरील योजनेचा लाभ यापुढे घेता येणार नाही. तुम्ही सदरील योजनेत अपात्र झाला आहात.
विशेष बाब
ज्या महिला यापूर्वी कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही त्यांना सादर योजना लागू असणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. अशा महिलांना चिंता करायची गरज नाही.
Please Like, Comment & Share