मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्रातील अविवाहित महिलांसाठी सशक्तीकरणाची योजना आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील अविवाहित, वंचित आणि गरजू महिलांना आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरण प्रदान करते. 1 जुलै 2024 रोजी लागू झालेली ही योजना, महिलांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार आणि स्वावलंबन यांसारख्या क्षेत्रात मदत करते.
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे जी 21 ते 65 वर्षे
वयोगटातील, अल्प उत्पन्न असलेल्या महिलांना आर्थिक मदत करते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, महिलांनी खालील आवश्यक कागदपत्रे
जमा करणे आवश्यक आहे:
योजनेसाठी पात्रता
निकष
1) महाराष्ट्राची
रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) वय 21 ते 65
वर्षे दरम्यान असावे.
3) कुटुंबाची
वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाख पेक्षा कमी असावे.
4) महिला अविवाहित,
विधवा, विभक्त किंवा परित्यक्ता असावी.
4) इतर कोणत्याही
सरकारी आर्थिक मदत योजनेचा लाभ घेत नसणे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
:
1) अर्जदाराचे आधार
कार्ड
2) बँक पासबुक
3) राशन
कार्ड/शिधापत्रिका
4) अधिवास
प्रमाणपत्र
5) जन्म प्रमाणपत्र
6) विवाह प्रमाणपत्र
(विवाहित महिलांसाठी)
7) पासपोर्ट आकाराचा
फोटो
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केलेले मोठे बदल
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना 2024
मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या योजनेसाठी आता केवळ खालील कागदपत्रे आवश्यक
आहेत:
1) रहिवासी /आधिवास
प्रमाणपत्र नसल्यास त्या ऐवजी 15
वर्षापूर्वीचे 1. रेशन कार्ड 2. मतदार
ओळखपत्र 3. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 4. जन्म दाखला. या चारपैकी कोणतेही ओळखपत्र/ प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात जाईल.
2) उत्पन्न
दाखला- रु.2.5 लक्ष उत्पन्न दाखला
उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना
उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे.
3) परराज्यात जन्म
झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर
पतीचे 1. जन्म दाखला 2. शाळा सोडल्याचे
प्रमाणपत्र 3. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल.
4) सदर 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे.
5) सदर लाभार्थी
महिलांचा वयोगट 21 ते 65 वर्ष वयोगट
करण्यात येत आहे.
6) कुटुंबातील एका
पात्र अविवाहित महिलेला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजनेचे फायदे:
1) पात्र महिलांना
दर महिन्याला ₹1500 आर्थिक मदत मिळते.
2) शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध.
3) महिलांना सामाजिक
सुरक्षा योजनांमध्ये समाविष्ट करण्यात येते.
4) महिलांच्या
आरोग्य आणि स्वच्छतेसाठी जागरूकता कार्यक्रम राबवले जातात.
योजनेचा लाभ
घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
सदर योजनेच्या
लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.
Please Like, Comment & Share