Police bharti 2024 ही बारावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झालेली आहे. राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दलाच्या अंतर्गत असलेल्या पोलीस घटकातील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या एकूण १४२९४ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस भरती 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे?
पात्रता धारक उमेदवार इयत्ता बारावी (एच.एस.सी.) परीक्षा उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात पाहावी.)
Police bharti 2024 करिता वयोमर्यादा कशी आहे
1) खुल्या प्रवर्गातील वय १८ ते २८ वर्षे
2) मागासवर्गीय प्रवर्गातील वय १८ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
पोलीस भरती 2024 करिता फीस किती आहे ?
1) खुल्या प्रवर्ग Rs.४५०/- रुपये
2) मागासवर्गीय प्रवर्ग Rs.३५०/- रुपये फीस आहे.
Police bharti 2024 अर्ज करण्याची तारीख
दिनांक ५ मार्च २०२४ पासून दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पोलीस भरती 2024 करिता वारंवार विचारले जाणारे प्रश्न
पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
पात्रता धारक उमेदवारांनी सर्व जाहिरात व्यवस्थित वाचून मजकूर समजून घेऊन संबंधित ऑनलाईन फॉर्म भरणा सेंटर किंवा तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेऊन ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.
पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यात जागा जास्त आहेत?
उमेदवाराने त्यांच्या स्थानिक किंवा त्यांच्या प्रवर्गनिहाय असलेल्या जागेचा विचार करून पोलीस भरतीसाठी जिल्हा निवडावयाचा असून त्यानंतर अर्ज करावयाचा आहे.
मागासवर्गीय उमेदवारास पोलीस शिपाई पदासाठी अर्ज करता येईल का?
होय मागासवर्गीय उमेदवारांना पोलीस भरती 2024 मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे गरजू उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. बहुतांश जिल्ह्यामध्ये चांगल्या जागा रिक्त आहेत.
पोलीस भरती परीक्षा कशी राहील?
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ईमेल किंवा मोबाईल द्वारे परीक्षा बाबत सूचना कळविण्यात येतील त्या उपयोगी परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचून पहावी.
पोलीस भरतीसाठी मैदान व इतर शारीरिक बाबी कशा असाव्यात?
पोलीस भरती 2024 अंतर्गत नमूद केलेल्या जाहिरातीमध्ये उमेदवाराचे ग्राउंड व इतर शारीरिक बाबी विषयी सविस्तर माहिती देण्यात आलेले आहे.
राज्य पोलीस भरती 2024, अर्ज करतांना ह्या बाबींकडे द्या लक्ष
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रज्वल डिजिटल सर्विसेस, नेताजी नगर, लातूर
mo. No. 9689644390
Please Like, Comment & Share