महाराष्ट्रातील अधिवास अथवा रहिवाशी असल्याचे सिद्ध करण्यासाठी, विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी, नोकरीसंदर्भात अर्ज करण्यासाठी, भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी आणि शालेय विद्यार्थी, पदवीधर व उच्च पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी व नागरिकांना खाजगी कामासाठी तहसीलदार यांनी निर्गमित केलेल्या अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असते.
तहसीलदार अधिवास/ रहिवाशीसाठी कागदपत्रे :-
तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र (Tahsildar Domicile Certificate)
मिळवण्यासाठी सर्वप्रथम खालील आवश्यक कागदपत्रे जाणून घेणे आवश्यक
आहे.
१) रहिवाशी
स्वंयघोषणापत्र
२) शाळा
सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड दाखला
३) तलाठी
अहवाल
४) चालू सालचा
घरचा उतारा किंवा सातबारा
५) रेशन कार्ड
(झेरॉक्स)
तहसीलदार अधिवास/ रहिवाशी प्रमाणपत्राचा कालावधी :
विहित
नमुन्यात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज केल्यानंतर कार्यालयीन ४ दिवस तहसीलदार
अधिवास/ रहिवाशी दाखल्यासाठी लागतात.
तहसीलदार अधिवास/ रहिवाशी प्रमाणपत्रासाठी (Domicile Certificate) अर्ज
कोठे करावा ?
अर्जदाराने तहसीलदार
अधिवास/
रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी उक्त सर्व कागदपत्रे घेऊन
आपल्या तालुक्याच्या तहसील कार्यालय किंवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा
महा-ई-सेवा केंद्र अथवा साबळे आपले सरकार सेवा केंद्र, लातूर येथील पशुवैद्यकीय
दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर येथे करता येईल.
तहसीलदार अधिवास/रहिवाशी प्रमाणपत्र (Domicile Certificate) संपर्क
?
साबळे भिवराज
मो.नं. 7709582650
Please Like, Comment & Share