भारतीय राज्यघटनेनुसार सर्व आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय लाभ अथवा सवलत मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र (Cast Certificate in Marathi) अनिवार्य आहे. व्यक्तींची जात ओळख ओखण्यासाठी सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. विविध घटकांसाठी आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींना लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र (Cast Certificate in Marathi) आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्राचे लाभ-Benefit of Caste
Certificate
1) सरकारी
नोकरीत आरक्षण मिळते.
2) शाळा-महाविद्यालयीन प्रवेश शुल्कात सूट मिळते.
3) उमेदवारास
निरनिराळ्या निवडणुका लढविण्यासाठी.
4) शासकीय
अथवा निमशासकीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतांना.
5) सरकारी
नोकरीत वयोमर्यादेत अतिरिक्त वयाची सूट मिळण्यासाठी.
6) सर्व
शासकीय शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी.
एकंदरीत
विचार केल्यास सर्व शासकीय लाभ मिळण्यासाठी जात प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वरील
सर्व बाबींचा विचार केल्यास सर्व सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि महत्वाचे
म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी त्यांचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जात
प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
जात प्रमाणपत्रासाठी अनिवार्य कागदपत्रे :-
१)
रहिवाशी स्वंयघोषणापत्र
२)
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड दाखला
३)
वडिलांचे कागदपत्रे
4) जातीचे प्रमाणपत्र किंवा जातीचा पुरावा- नातेसंबंधातील जातीचा दाखला असल्यास १०० रू च्या स्टॅम्प पेपवर कुटुंबाची वंशावळी नोकरीकृत
5) आधार
कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स
6)
मुलाचे कागदपत्रे
7) आधार
कार्ड झेरॉक्स
8) शाळा
सोडल्याचा दाखला ( टी.सी.) /प्रवेश
निर्गम उतारा / बोनाफाईड
9) कलर
पासपोर्ट फोटो
जात प्रमाणपत्र येण्यास कालावधी :
कार्यालयीन 15 दिवस.
जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज कोठे करावा ?
जात
प्रमाणपत्रासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तालुका तहसील कार्यालय किंवा महा-ई-सेवा
केंद्र अथवा आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी ठिकाणी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज
सादर करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क
साबळे
आपले सरकार सेवा केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्या समोर, नेताजी नगर, लातूर
मो.नं.
7709582650
Please Like, Comment & Share