अर्ज
भरण्याचा कालावधी किती आहे?
केंद्रप्रमुख
परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत
आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार आहेत. परीक्षेबाबतची सविस्तर माहिती www.mscepune.in
संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परीक्षेचे
स्वरूप असे आहे?
IBPS कंपनीकडून नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने
शिक्षकांना केंद्रप्रमुख होण्यासाठी आपली गुणवत्ता सिध्द करावी लागणार आहे.
शासन
निर्णय 27 सप्टेंबर 2023 नुसार
विभागीय केंद्रप्रमुख परीक्षेसाठी सुधारित नवीन अर्हता
कोणत्याही
मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम/बी.एस्सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक
आहे आणि ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा
प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडीत सेवा पूर्ण करणे
आवश्यक आहे.
कोणत्या
शिक्षकांना अर्ज करता येईल.
आता
सुधारित अर्हतेनुसार 50 वर्षे पेक्षा अधिक वय असलेले तसेच
ज्यांना पदवीला 50 टक्के पेक्षा कमी गुण असणारे जिल्हा परिषद
प्राथमिक शिक्षकही अर्ज करू शकणार आहेत.
केंद्रप्रमुख
वेतनश्रेणी : 9300 - 34800 ग्रेड पे वेतन + 4400
ऑनलाईन शुल्क कसा आहे?
- मागास प्रवर्गास रू. ९००/-
- खुल्या प्रवर्गास रू. १०००/-
फार्म भरण्यास आवश्यक कागदपत्रे :
- कलर पासपोर्ट फोटो
(3.5cm x 4.5cm)
- सही (Signature)
- डाव्या हाताचा अंगठा
(Thumb)
- प्रतिज्ञापत्र (Declaration)
- मोबाईल नंबर व ईमेल आयडी
- संपूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, पीनकोडसह
- पदानुसार शैक्षणिक कागदपत्रे (दहावी, बारावी, पदवी गुणपत्रक व इतर)
- जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता असल्यास
- रहिवासी प्रमाणपत्र असेल तर
- विवाहित असल्यास अपत्य संख्या
- कोणताही गुन्हा नोंद असल्याची गुन्ह्यांची माहिती
- इतर ऑनलाईन माहिती
अर्ज करण्याची शेवटी तारीख
केंद्रप्रमुख
परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख ०८/१२/२०२३ अशी आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
Please Like, Comment & Share