विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवाना

Admin
0

 

विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवाना

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निमशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आय.टी.आय. किंवा त्यासंबंधी इतर पदवी प्रमाणपत्र प्राप्त किंवा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास  सदरचा विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) सूट मिळण्याकरिता विहित नमुन्यात अर्ज करून संबंधित विद्युत निरीक्षक महावितरण कार्यालयाकडून परवाना निर्गमित केला जातो. सदर परवाना हा आय.टी.आय. प्रमाणपत्र उत्तीर्ण धारकांना दिला जातो.

विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड /पॅनकार्ड, टी.सी. झेरॉक्स
  • दहावी/बारावी गुणपत्रक किंवा सनद
  • आय.टी.आय. गुणपत्रक व सनद (शासकीय/निमशासकीय)
  • तहसीलदार राष्ट्रीयत्व (Nationality) प्रमाणपत्र
  • ४ कलर पासपोर्ट फोटो
  • शासकीय ई-चलन रू. ४००/-
  • १ वर्ष मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदाराचे अनुभव प्रमाणपत्र
  • मस्टर कॉपी
  • नोंदणी करतांना रू. ४००/- ई-चलन प्रत.


विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवान्याचा कालावधी

उमेदवाराने विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित विद्युत निरीक्षक महावितरण कार्यालयास दाखल केल्यापासून सर्वसाधारण २० ते २५ दिवसांनी कागदपत्राची पडताळणी करून विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवाना ऑफलाईन पद्धतीने महावितरण जिल्हा कार्यालयाकडून अनुज्ञाप्तीधारकास प्राप्त होतो.

विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवाना प्रक्रिया

सदर परवाना हा महाराष्ट्र शासन महावितरण कंपनीचे अधिकृत जिल्हास्तरीय विद्युत निरीक्षक कार्यालयात आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंदाजे २० ते २५ दिवसाचा कालावधीत सदर विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवाना संबंधितास निर्गमित केला जातो.    

विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज कसा करावा?

महावितरण कार्यालयाचा मान्यता प्रस्ताव सदर विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवान्यासाठी आवश्यक आहे. सदर विहित अर्ज हा टंकलिखित करून त्यावर फोटो व सही व वर नमूद आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित महावितरण जिल्हा कार्यालयास सादर करावयाचा आहे.

अर्ज टंकलिखित करण्यासाठी संपर्क :

Prajwal Digital Services, Netaji Nagar, Near Veterinary Hospital, Gate No.2, Latur-413512

नोट : सदर विद्युत पर्यवेक्षक (सुपरवॉयझर) परवान्याचा विहित नमुन्यातील अर्ज Prajwal Digital Services येथे टंकलिखित तयार करून दिला जातो. या व्यतिरिक्त इतर सर्व शासकीय प्रक्रिया ही जिल्ह्याचे अधिकृत म्हणजेच विद्युत निरीक्षक महावितरण कार्यालयाच्या अधीन राहून केले जाते. अधिक माहितीसाठी संबंधिताने विद्युत निरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. कारण परवान्यासंबंधी वेळोवेळी शासकीय नियम व अटीत बदल होत असतो.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!