जिल्हा परिषद भरती-२०२३ चे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे?

Admin
0

जिल्हा परिषद भरती-२०२३ चे प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करावे?

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद अंतर्गत आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज यापूर्वीच म्हणजेच दिनांक ५ ते २५ ऑगस्ट २०२३ दरम्यान मागविण्यात आले होते. त्यानुसार सदर ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज केलेल्या विविध पदांसाठी परीक्षेचे हॉल तिकीट दि. ८ आक्टोबर २०२३ रोजी संकेतस्थळावर उपलब्ध केले जाणार आहे. त्यानुसार उमेदवाराने त्यांच्या गट-क संवर्गातील पदानुसार फार्म भरलेला आयडी व पासवर्डचा वापर करून हॉलतिकीट डाऊनलोड करून घ्यावे.

गट-क संवर्गातील प्रवेश पत्र कोणत्या पदाचे आहे?

आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि/ सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे).

Hall Ticket कसे डाऊनलोड करावे?

  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.
  • Click here to Download Link [IBPS]
  • त्यानंतर समोर लॉगीन फार्म ओपन होईल.
  • वर दर्शविल्याप्रमाणे उमेदवाराने त्यांचा पदानुसार आयडी व पासवर्ड किंवा जन्‍मतारीख टाकावी.
  • त्यानंतर Security Code कॅप्चा अचूक टाकावा.
  • लॉगीन करावे व डॅशबोर्ड मध्ये Admit Card /Hall Ticket पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून प्रवेश पत्र डाऊनलोड करावे.
  • Admit Card /Hall Ticket काढण्यासंबंधी कोणत्याही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास IBPS Technical Support ला ई-मेलद्वारे सूचित करावे.

टीप : कलर प्रवेश पत्र असल्याशिवाय संबंधित परीक्षा सेंटरवर प्रवेश दिला जात नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.

उमेदवारांना PDS LATUR मार्फत परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा !

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

Please Like, Comment & Share

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!