जिल्हा परिषद भरती २०२३ अंतर्गत उमेदवाराने गट-क संवर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. त्यानुसार IBPS मार्फत परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. मात्र काही उमेदवारांना ईमेलद्वारे हॉल तिकीट काढण्यासंबंधी सूचना प्राप्त झालेल्या आहेत. मात्र काही उमेदवारांना अजून त्यांचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे उमेदवारांनामध्ये जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेसंदर्भात सभ्रम निर्माण झालेला आहे व त्यांना हॉल तिकीट अद्यापपपर्यंत प्राप्त झालेले नाहीत. किंवा तशी सूचना संबंधित कंपनीकडून उमेदवारांना देण्यात आलेल्या नाहीत.
हॉल तिकीट कोणत्या पदाचे डाऊनलोड करता येईल?
उमेदवाराने विहित मुदतीत ऑनलाईन अर्ज पुढीलपैकी पदांसाठी केला आहे. आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ बांधकाम/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, तारतंत्री, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लघुलेखक (उच्च श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि/ सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) या पदांपैकी उमेदवाराने अर्ज केलेला आहे त्यानुसार त्यांना आयडी व पासवर्ड टाकून हॉल तिकीट डाऊनलोड करता येईल.
हॉल तिकीट प्राप्त होत नसल्यास काय करावे?
हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासंबंधी काही अडचणी निर्माण झाल्यास किंवा हॉल तिकीट प्राप्त होत नसल्यास उमेदवाराने IBPS Technical Support या कंपनीला ई-मेलद्वारे त्यांची रितसर तक्रार दाखल करावी व अडचणी संबंधी सूचना देण्यात याव्या.
Please Like, Comment & Share