महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट 'अ', 'ब' आणि 'क' संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु ज्या उमेदवाराचा तारतंत्री वॉयरमन/ इलेक्ट्रीशीयन /डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. त्यांना वीज तारतंत्री परवाना ऑनलाईन फार्मसाठी अनिवार्य केलेला आहे.
सदर वीजतंत्री श्रेणी गट-२ या पदाकरिता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शालांत परीक्षा उत्तीर्ण व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. ही अट असल्यामुळे ज्या उमेदवारांचा शासकीय अथवा निमशासकीय आय.टी.आय., इलेक्ट्रीशियन /वॉयरमन /डिप्लोमा झालेला आहे. त्यांनी विहित मुदतीत संबंधित विद्युत महाऊर्जा कार्यालयाकडून अनुज्ञापक मंडळाचे प्रमाणपत्र प्राप्त करणे गरजेचे आहे.
तारतंत्री वॉयरमन/ इलेक्ट्रीशीयन परवाना कसा मिळेल.
विहित नमुन्यात अर्ज, ई-चलन व इतर शैक्षणिक कागदपत्रे जोडून संबंधित महावितरण विभागाच्या उर्जा कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावायाचा आहे. त्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधितास तारतंत्री वॉयरमन/ इलेक्ट्रीशीयन परवाना प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल.
तारतंत्री, वॉयरमन/ इलेक्ट्रीशीयन परीक्षेत सूट मिळण्याकरिता चलन
- ई-शुल्क (Govt. fees) - 400/-
- चलन वेबसाईट : https://gras.mahakosh.gov.in/echallan/
- विहित नमुन्यातील प्रस्ताव व इतर आवश्यक कागदपत्रांची प्रती.
तारतंत्री वॉयरमन/ इलेक्ट्रीशीयन परवाना मिळण्यास किती वेळ लागेल.
विहित नमुन्यात अर्ज, ई-चलन व इतर कागदपत्रे सादर करून प्रस्ताव संबंधित कार्यालयास सादर झाल्यानंतर सदर अर्जाबाबत आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर म्हणजेच साधारणपणे २० ते २५ दिवसाचा कालावधी लागेल. काही कारणास्तव विलंब लागू शकेल.
परवान्यासाठी आवश्यक कागदत्रे
- विहित नमुन्यात अर्ज
- आधार कार्ड /पॅनकार्ड
- शाळा सोडल्याच दाखला (टी.सी.)
- रहिवासी / नॅशनलिटी प्रमाणपत्र (तहसीलदार)
- जातीचे प्रमाणपत्र
- ई-चलन रू. ४००/- (मुद्रांक शुल्क)
- दहावी व बारावी गुणपत्रक/सनद
- आय.टी.आय. दोन्ही वर्षांचे गुणपत्रक
- अनुभव प्रमाणपत्र
- अभ्यासक्रमासंबंधी इतर आवश्यक कागदपत्रे
अधिक माहितीसाठी :
सदर उमेदवाराने महाऊर्जा कार्यालय, श्रमसाफल्य हाऊसिंग सोसायटी, लातूर येथे संपर्क साधावा आणि अधिक माहिती जाणून घ्यावी.
परवाना काढण्यासंबंधी संपर्क :
Prajwal Digital Services, पशुसंवर्धन गेट नं. 2, केशवराज शाळा रोड, नेताजी नगर, लातूर Email: [email protected]
Please Like, Comment & Share